शेअर मार्केटमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांची माहिती (भाग 1)

Share market information in marathi,
share market marathi, marathi stock market, stock market information, terms used in share market

नमस्कार मित्रांनो, या संकेतस्थळाच्या माध्यमातून आम्ही शेअर मार्केट विषयी माहिती देत असतो. या लेखाच्या माध्यमातून आपण शेअर मार्केट मध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांविषयी जाणून घेणार आहोत. 


1. खरेदी (Buy) -
शेअर्स खरेदी करणे म्हणजे एखाद्या कंपनीचे भाग विकत घेणे व त्या कंपनीचे भागधारक व मर्यादित प्रमाणात मालक होणे होय.

2. विक्री (Sell) -
सेल म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर्स खूप वाढले असता त्यातून मिळणारा नफा आपल्या पदरात पाडण्यासाठी त्या शेअरची विक्री करणे होय.

3. भांडवल (Capital) -
एखाद्या कंपनीचे किंवा व्यवसाय संस्थेचे बाजारपेठेतील असलेली एकूण मूल्य म्हणजे भांडवल होय.

4. एक्सचेंज (Exchange) -
एक्सचेंज म्हणजे अशी जागा किंवा व्यवस्था जिथे शेअर्स व कर्जरोख्यांची खरेदी व विक्री केली जाते.

5. ब्रोकर (Broker) -
ब्रोकर म्हणजे अशी व्यक्ती किंवा संस्था जिच्या माध्यमातून आपण शेअर्सची खरेदी व विक्री करू शकतो.

6. मार्केट हवर्स (Market Hours) -
शेअर्स खरेदी व विक्री करण्यासाठी शेअर बाजाराची वेळ. भारतीय शेअर बाजारासाठी सकाळी 9:15 ते ‌दुपारी 3:30 (सोमवार ते शुक्रवार).

7. लाभांश (Devidend) -
कंपनीच्या नफ्यातून भागधारकांना त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात दिलेली ठराविक रक्कम.

8. आयपीओ (IPO) -
जेव्हा एखादी खाजगी मर्यादित कंपनी सार्वजनिक कंपनी मध्ये रुपांतरीत होते व शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदा आपल्या शेअरची विक्री करते या प्रक्रियेला आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर असे म्हणतात.

9. पोर्टफोलिओ (Portfolio) -
आपल्या मालकीच्या शेअर्स चा संग्रह म्हणजे पोर्टफोलिओ.

10. सेक्टर (Sector) -
एका विशिष्ट क्षेत्रातील शेअर्स चा गट.


मित्रांनो आम्ही दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. शेअर मार्केट विषयी तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरुर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तर जरूर देऊ. ही पोस्ट जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना शेअर मार्केट विषयी असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
मित्रांनो आम्ही दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. शेअर मार्केट विषयी तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरुर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तर जरूर देऊ. ही पोस्ट जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना शेअर मार्केट विषयी असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या