Share market information in marathi,
what is bid and ask price, share market in marathi, marathi share market, stock market information, marathi stock market,
11. बीड प्राईस (Bid Price) -
बीड प्राईस म्हणजे बोली किंमत होय. बीड प्राईस म्हणजे एखाद्या शेअरची खरेदी करण्यासाठी आपण किती रक्कम देण्यास इच्छुक आहात.
12. आस्क प्राईस (Ask Price) -
आस्क प्राईस म्हणजे आपल्याकडे असलेला एखादा शेअर आपण किती किमतीत विकू इच्छित आहात.
13. लिमीट ऑर्डर (Limit Order) -
लिमीट ऑर्डर म्हणजे एखाद्या शेअरची खरेदी किंवा विक्री एखाद्या ठराविक किमतीस करणे. यांमध्ये आपल्या मनात असलेल्या किमतीस आपण एखादा शेअर खरेदी किंवा विक्री करू शकतो, परंतु त्यासाठी विक्रेत्याला ती किंमत मान्य असणे आवश्यक असते.
14. मार्केट ऑर्डर (Market Order) -
मार्केट ऑर्डर म्हणजे सध्या असलेल्या बाजारभावानुसार शक्य तितक्या लवकर शेअर्स खरेदी किंवा विक्री करणे.
15. बुल मार्केट (Bull Market) -
बुल मार्केट म्हणजे शेअर बाजाराची अशी स्थिती जिथे शेअर्स च्या किमती वाढलेल्या असतात.
16. बिअर मार्केट (Bear Market) -
बिअर मार्केट म्हणजे शेअर बाजाराची अशी स्थिती जिथे शेअर्स च्या किमती अतिशय कमी झालेल्या असतात. जेव्हा शेअर बाजार कोसळतो त्याला बिअर मार्केट असे म्हणतात.
17. अस्थिरता (Volatility) -
अस्थिरता म्हणजे शेअर बाजाराची अशी स्थिती जिथे शेअर्स च्या किमती कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर कमी जास्त होतात.
18. बोनस शेअर्स (Bonus Shares) -
बोनस शेअर्स म्हणजे भागधारकांनी धारण केलेल्या शेअर्सच्या प्रमाणात त्यांच्या कडून कुठलाही मोबदला न घेता जास्तीचे शेअर्स देणे.
19. फेस व्हॅल्यू (Face Value) -
फेस व्हॅल्यू ही शेअर ची दर्शनी किंमत असते जी शेअर प्रमाणपत्रावर नमूद केलेली असते. शेअर मार्केटमध्ये फेस व्हॅल्यू चे महत्त्व कमी आहे.
20. मार्केट व्हॅल्यू (Market Value)
मार्केट व्हॅल्यू म्हणजे एखाद्या शेअर ची बाजारातील किंमत होय. आपण कुठलाही शेअर मार्केट व्हॅल्यू वर खरेदी किंवा विक्री करू शकतो. त्यामुळे मार्केट व्हॅल्यू चे खूप महत्व असते.
मित्रांनो आम्ही दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट्स द्वारे नक्की कळवा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
Thank You.
0 टिप्पण्या