मराठी माणूस आणि शेअर मार्केट

21 व्या शतकात आपला मराठी माणूस कुठल्याही क्षेत्रांमध्ये मागे नाही. आपल्या मराठी माणसाने प्रत्येक क्षेत्रामध्ये सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. आज जगभरातल्या नामांकित संस्थेच्या उच्चपदस्थ ठिकाणी मराठी माणूस सहज दिसून येतो. परंतु उद्योग व्यवसायामध्ये व शेअर मार्केटमध्ये मराठी माणसाचा सहभाग अतिशय कमी आहे. प्रामुख्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला मराठी माणूस घाबरतो. शेअर मार्केट हे अवघड आहे, क्लिष्ट आहे, शेअर मार्केट हा जुगार आहे अशी धारणा सर्वत्र दिसून येते. परंतु येणाऱ्या आधुनिक काळाबरोबर मराठी माणूस ही शेअर मार्केटमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु हा वेग अतिशय कमी आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून मराठी माणसाला शेअर मार्केट ची ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे. तसेच मराठी माणसाने या अफाट संधीच्या दुनियेमध्ये प्रवेश करावा यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम या संकेतस्थळाच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करेल.
तर चला मित्रांनो ह्या प्रवासाची सुरुवात करूया.
श्री गणेशा !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या