Stock exchanges in india, india stock exchange in marathi, marathi share Market, stock market marathi
नमस्कार मित्रांनो, या पोस्टच्या माध्यमातून आपण भारतातील विविध स्टॉक एक्सचेंज ची माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय याची माहिती घेऊ
स्टॉक एक्सचेंज म्हणजे एक अशी व्यवस्था ज्याद्वारे देशातील विविध ठिकाणी विखुरलेले लोक ऑनलाईन पद्धतीने शेअर्स विक्री करू शकतात.
शेअर मार्केटचे सर्व व्यवहार स्टॉक एक्सचेंज च्या माध्यमातून केले जातात. म्हणून स्टॉक एक्सचेंजला शेअर मार्केट च्या विश्वामध्ये खूप महत्त्व आहे.
भारतातील मुख्य स्टॉक एक्सचेंज
भारतामध्ये विविध राज्यांमध्ये स्थानिक स्टॉक एक्सचेंज आहेत. परंतु मुख्यत शेअर खरेदी-विक्री चे व्यवहार दोन स्टॉक एक्सचेंज च्या माध्यमातून केले जातात. ही भारतातील दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत.
1. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) -
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा मुंबई स्टॉक एक्सचेंज या नावानेही ओळखला जातो. हा भारतातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे. BSE ची सुरुवात 1875 साली झालेली आहे. BSE मध्ये 5 हजार पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत. BSE च्या निर्देशांकाला सेन्सेक्स असे म्हटले जाते.
2. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) -
NSE हा भारताचा सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज आहे. NSE ची सुरुवात 1992 साली झालेली आहे. भारतामध्ये शेअर्स खरेदी व विक्रीचे सर्वात जास्त व्यवहार NSE वर होतात. नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा निर्देशांक निफ्टी या नावाने ओळखला जातो.
0 टिप्पण्या