मित्रांनो शेअर मार्केटचे दोन प्रमुख भाग आहेत. या पोस्टच्या माध्यमातून आपण या दोन प्रमुख भागांची माहिती घेणार आहोत. हे दोन भाग प्रायमरी शेअर मार्केट व सेकंडरी शेअर मार्केट या नावाने ओळखले जातात.
1. प्रायमरी शेअर मार्केट (Primary Share Market) -
जेव्हा एखादी कंपनी स्टॉक एक्सचेंज च्या माध्यमातून पहिल्यांदा आपल्या शेअर्सची विक्री करून भांडवल उभारते तेव्हा ती कंपनी आयपीओ (IPO) बाजारात आणते, या बाजाराला प्रायमरी मार्केट असे म्हणतात. या प्रक्रियेसाठी नव्या कंपनीला रजिस्ट्रेशन करावे लागते. व एका ठराविक कालावधीनंतर ही कंपनी स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्ट होते.
2. सेकंडरी शेअर मार्केट (Secondary Share Market) -
सेकंडरी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असलेल्या सर्व कंपन्यांच्या शेअर ची खरेदी-विक्री केव्हाही करता येते. यामधील शेअर्सच्या किमती प्रत्येक सेकंदाला कमी-जास्त होत असतात, त्यामुळे शेअर्स खरेदी व विक्री करताना बाजार भावाविषयी सतर्क असणे आवश्यक असते. सेकंडरी शेअर मार्केट चे सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 यामध्ये केव्हाही करता येतात. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शेअर मार्केट बंद असते.
तर मित्रांनो आम्ही दिलेली माहिती आपणास कशी वाटली याविषयी खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याखेरीज तुमच्या शेअर मार्केट विषयी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये आपण विचारू शकता. धन्यवाद.
0 टिप्पण्या