what is demat account, demat account in marathi, benefits of demat account, disadvantages of demat account, share market in marathi
नमस्कार मित्रांनो, या आधीच्या सत्रात आपण डिमॅट अकाउंट म्हणजे काय ? हे समजून घेतले आहे. या पोस्टच्या माध्यमातून आपण डिमॅट अकाउंट चे फायदे व तोटे याविषयी माहिती घेणार आहोत.
डिमॅट अकाउंट चे फायदे ( Benefits of Demat Account) -
1. डिमॅट अकाउंट च्या माध्यमातून शेअर्स खरेदी केल्यावर त्या शेअर्सची चोरी होण्याचा धोका नसतो.
2. डिमॅट अकाउंट शेअर्स साठवण्याचा अतिशय सोपा व सोयीस्कर मार्ग आहे.
3. डिमॅट च्या माध्यमातून जगभरातल्या कुठल्याही कोपऱ्यातून शेअर्सची खरेदी व विक्री करता येते.
4. डिमॅट प्रक्रियेच्या आधी शेअर्स ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची व वेळ खाऊ होती. परंतु डिमॅट अकाउंट च्या माध्यमातून काही सेकंदात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे शेअर्स ट्रान्सफर होतात.
5. शेअर प्रमाणपत्रे (Share Certificate) हरवण्याचा व फाटण्याचा धोका नसतो.
6. शेअर्स खरेदी विक्री करताना ट्रांजेक्शन काॅस्ट व स्टॅम्प ड्युटीत बचत होते.
7. विविध प्रकारच्या कुरियर व पोस्टेज च्या खर्चात बचत होते.
डिमॅट अकाउंट चे तोटे (Disadvantages of Demat account) -
डिमॅट अकाउंट अनेक फायदे आहेत. त्याच बरोबर त्याचे काही किरकोळ तोटे सुद्धा आहेत खऱ्या अर्थाने हे तोटे नसून डिमॅट अकाउंट च्या मर्यादा आहेत.
1. डिमॅट अकाउंटच्या देखभालीसाठी दरवर्षी देखभाल खर्च (Maintenance Cost) द्यावी लागते.
2. आपण आपले शेअर्स कोणाला विकले हे समजत नाही.
3. आपण कोणाकडून शेअर विकत घेतले हे कधीही कळत नाही.
4. दुर्गम भागांमध्ये जिथे इंटरनेट उपलब्ध नाही अशा ठिकाणावरून डिमॅट अकाउंट वापरता येत नाही. डिमॅट अकाउंट वापरण्यासाठी इंटरनेट ची आवश्यकता असते.
5. स्टॉक ब्रोकर ची आपल्या डिमॅट अकाउंट च्या आर्थिक व्यवहारांवर नेहमी नजर असते.
मित्रांनो या पोस्ट विषयी व एकूणच शेअर बाजाराविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स च्या माध्यमातून ते विचारू शकता.
Thank You...
0 टिप्पण्या