Disadvantages of Investment in Share Market, limitations of share market
नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आधिच्या लेखामध्ये आपण शेअर मार्केट मध्ये केलेल्या गुंतवणुकीचे फायदे जाणून घेतले ह्या लेखामध्ये आपण शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या मर्यादा किंवा तोटे अभ्यासणार आहोत.
मर्यादा किंवा तोटे
1.जोखीम
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा हा सर्वात प्रमुख तोटा आहे. जर एखादी कंपनी व्यवसायामध्ये वाईट प्रदर्शन करत असेल व तिची आर्थिक स्थिती खालावलेली असेल तर गुंतवणूकदार त्या कंपनीचे शेअर्स पटापट विकतात त्यामुळे शेअर्सची किंमत जोरात कोसळते त्यामुळे गुंतवणुकदारांना मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.
2.भावनात्मक खरेदी-विक्री
अनेक गुंतवणूकदार भावनेच्या आहारी जाऊन वाढलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात तसेच शेअर्सच्या किंमती पडू लागल्यावर घाबरून जाऊन शेअर विकतात व नुकसान सहन करतात.
3. माहिती
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध प्रकारची माहिती व व्यावसायिक संस्था व कंपन्यांची अद्ययावत माहिती असणे आवश्यक असते. ही माहिती आपण या संकेतस्थळावर ही बघू शकता.
4.आर्थिक मंदी
अनेक वेळा विविध कारणांनी जगामध्ये आर्थिक मंदीचे सावट पसरते त्यामुळे जगातील बहुसंख्य शेअर बाजार कोसळतात व गुंतवणूकदारांचे नुकसान होते. परंतु या आर्थिक मंदीच्या स्थितीमध्ये घाबरून शेअर्स न विकता या मंदीचे संधीत रूपांतर करणे आवश्यक असते. आर्थिक मंदीच्या काळात गुंतवणूकदार स्वस्तात शेअर्स खरेदी करतात व नंतर वाढलेल्या भावात त्या शेअर्सची विक्री करून नफा कमावतात.
मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स च्या आधारे आम्हाला जरूर कळवा. व हि पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
0 टिप्पण्या