benefits of investing in share market, benifits of share market, Share market marathi
नमस्कार मित्रांनो या लेखाच्या माध्यमातून आपण शेअर मार्केट मधील गुंतवणुकीचे विविध फायदे बघणार आहोत.
फायदे
1. आकर्षक परतावा
शेअर मार्केट मध्ये केलेल्या गुंतवणुकीचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे गुंतवणुकीवर मिळणारा परतावा. शेअर मार्केट मध्ये प्रत्येक कंपनीचे शेअर्स प्रत्येक दिवशी कमी जास्त होत असतात, परंतु शेअर मार्केटमध्ये दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक बाकीच्या सर्व गुंतवणुकीपेक्षा ( व्याज, मुदतठेवी, कर्जरोखे, सोने, रिअल इस्टेट) जास्त परतावा देते.
2. लाभांश (Devidend)
बहुसंख्य कंपन्या प्रत्येक वर्षी आपल्या कमावलेल्या नफ्यातून एक विशिष्ट प्रत्येक भागधारकांना देतात. ही रक्कम सरळ भागधारकांच्या बँक खात्यामध्ये येते. त्यामुळे बहुसंख्य गुंतवणूकदार जास्त लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
3. बोनस शेअर्स (Bonus Shares)
जास्त नफा कमावणाऱ्या कंपन्या तसेच लवकर ग्रोथ करणार्या कंपन्या आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स वाटतात. यामध्ये भागधारकांना त्यांनी धारण केलेल्या शेअर्सच्या प्रमाणात फ्री मध्ये जास्तीचे बोनस शेअर्स मिळतात.
4.कंपनीच्या मालकीत वाटा
जेव्हा आपण कंपनीचे शेअर्स विकत घेतो तेव्हा आपण त्या कंपनीचे भागधारक व मालक होतो. यामध्ये गुंतवणूकदाराला कंपनीची मर्यादित मालकी मिळते तसेच काही मालकीहक्क मिळतात.
5. खरेदी-विक्रीची सोपी पद्धत
शेअर्स खरेदी विक्री ची पद्धत अतिशय सोपी आहे. आपण जगभरातल्या कुठल्याही ठिकाणाहून ऑनलाइन पद्धतीने कुठल्याही शेअर्सची खरेदी व विक्री करू शकतो. एका सेकंदा हुनही कमी वेळेत आपण शेअर्स खरेदी व विक्री करू शकतो.
0 टिप्पण्या