How to open demat account in marathi, demat account in marathi, demat account in hindi, share market information in marathi, stock market in marathi
डिमॅट अकाउंट चे 4 प्रमुख घटक -
1. सेंट्रल डिपॉझिटरी :
सेंट्रल डिपॉझिटरी हे सर्व गुंतवणूकदारांचे शेअर प्रमाणपत्रे व इतर दस्तऐवज जतन करण्याचे काम करते. भारतात राष्ट्रीय सुरक्षा डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL) या दोन डिपॉझिटरी आहेत.
2. डिपॉझिटरी पार्टीसीपंट (डिपी) :
डिपॉझिटरी पार्टीसीपंट हे शेअर मार्केटमधील मध्यस्थ असतात, यांच्यामार्फत गुंतवणूकदारांला डिपॉझिटरी सर्व्हिसेस घेता येतात. डिपॉझिटरी डिपॉझिटरी पार्टीसीपंट गुंतवणूकदाराला विविध प्रकारच्या आर्थिक सेवा देतात.
3. स्टॉक ब्रोकर :
स्टॉक ब्रोकर कडे आपल्याला डिमॅट अकाउंट उघडावे लागते. स्टॉक ब्रोकर च्या माध्यमातून आपण शेअर मार्केट मध्ये व्यवहार करू शकतो. भारतात विविध संस्था स्टॉक ब्रोकिंग चे काम करतात. त्यांची यादी या लेखाच्या शेवटी दिली आहे.
4. ट्रेडिंग अकाउंट :
ट्रेडिंग अकाउंट हे डिमॅट अकाउंट चा एक घटक असतो. ट्रेडिंग अकाउंट द्वारे एखाद्या शेअरची खरेदी-विक्री ची ऑर्डर देण्यात येते.
डिमॅट खाते उघडण्याची प्रक्रिया -
1. सर्वप्रथम आपल्याला कुठल्या स्टॉक ब्रोकर कडे आपले डिमॅट खाते उघडायचे आहे, याची निवड करावी लागते.
2. त्यानंतर स्टॉक ब्रोकर कडे जाऊन डिमॅट खाते ओपन करण्यासाठीचा फॉर्म भरा. आजकाल हा फॉर्म ऑनलाइन सुद्धा भरता येतो.
3. फॉर्मवर विविध ठिकाणी सह्या करा व आपले छायाचित्र चिटकवा.
4. त्यानंतर आपल्याला नियमांची व करारपत्रांची प्रत दिली जाईल ती नीट वाचा व त्यावर सह्या करा.
5. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांच्या छायांकित प्रती ब्रोकर ला द्या.
6. त्यानंतर तुम्हाला डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी चे शुल्क भरावे लागेल.
7. शुल्क भरल्यानंतर स्टॉक ब्रोकर फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष तुमचे सत्यापन (Verification) करेल.
7. त्यानंतर स्टॉक ब्रोकर तुम्हाला डिमॅट खाते क्रमांक व व ग्राहक आयडी देईल.
8. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर तुम्ही स्टॉक ब्रोकर च्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲप च्या माध्यमातून शेअर बाजारामध्ये शेअर्स खरेदी व विक्री करू शकता.
डिमॅट खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे -
डिमॅट खाते उघडण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
1. पॅन कार्ड
2. रहिवास प्रमाणपत्र (खालील पैकी एक)
आधार कार्ड
पासपोर्ट
रेशन कार्ड
वोटर आयडी
ड्रायव्हिंग लायसन्स
विज बिल
3. पासपोर्ट साईज फोटो
4. बँकेचा क्रॉस चेक
5. बँक खाते स्टेटमेंट
Groww ह्या स्टॉक ब्रोकर कडे आपण फक्त पाच मिनिटात आपले डिमॅट अकाउंट घरबसल्या उघडू करू शकता तेही अगदी मोफत.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन आपण Groww वर अकाउंट उघडू शकतो. खाली दिलेल्या लिंक वरून अकाउंट उघडल्यास आपल्याला 100 रुपये ओपनिंग बोनस मिळेल.
Groww Demat Account Opening Link
मित्रांनो या पोस्ट विषयी व एकूणच शेअर बाजाराविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स च्या माध्यमातून ते विचारू शकता.
Thank You...
2 टिप्पण्या
why one have to give crosscheck and bank statment for open demat account.
उत्तर द्याहटवाTo verify the bank account.
हटवा