share market in marathi, ipo in marathi, ipo in hindi, ipo meaning in marathi, share market mahiti, ipo watch, ipo updates, stock market in marathi
1. प्राइस बैंड (Price Band) -
प्राइस बैंड म्हणजे एक श्रेणी असते, ज्याच्या मध्ये कुठल्याही किमतीला तुम्ही आयपीओची बोली लावू शकतात.
उदा. जर एखाद्या आयपीओचा प्राइस बैंड 50 ते 60 असेल तर तुम्ही 50 ते 60 मधील कोणत्याही किमतीला बोली लावू शकता.
2. इश्यू प्राईस (Issue Price) -
इश्यू प्राईस म्हणजे अशी प्राईस ज्यावर कंपनी आपले शेअर्स गुंतवणूकदारांना ऑफर करतात. या हरविलेल्या किमतीवर गुंतवणूकदार कंपनीचे शेअर्स घेऊ शकतात.
3. बिड लॉट (Bid Lot) -
बिड लॉट गुंतवणूकदाराला कमीत कमी किती शेअर्स अनिवार्य आहे.
साधारणतः 10 शेअर्स, 20 शेअर्स, 30 शेअर्स असे लॉट असतात.
4. इश्यू साइज़ (Issue size) -
एखाद्या कंपनीद्वारे आयपीओ मध्ये ऑफर केल्या गेलेल्या एकूण शेअर्सची संख्या म्हणजे इश्यू साईज होय.
5. क्यूआईबी (QIB) -
आयपीओ मध्ये 50 टक्के शेअर्स क्यूआईबी म्हणजेच म्युच्युअल फंड, बँका, विमा कंपन्या यासारख्या संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला जातो.
6. एनआईबी (NIB) -
आयपीओ मध्ये 15 टक्के शेअर्स हे इतर संस्थात्मक गुंतवणूकदार नसलेल्या संस्थांसाठी राखीव ठेवले जातात.
7. रिटेल Retail) -
आयपीओ मध्ये 35 टक्के शेअर्स सर्वसामान्य भारतीयांसाठी राखीव ठेवले जातात. 1 लाखापेक्षा कमी गुंतवणूक असलेल्यांसाठी हे शेअर्स राखीव असतात.
8. लिस्टिंग (Listing) -
लिस्टिंग म्हणजे स्टॉक एक्सचेंज वर शेअर्स सूचीबद्ध होणे होय. आयपीओ लिस्ट झाल्यानंतर त्या शेअरची खरेदी विक्री कोणालाही कधीही करता येते.
मित्रांनो हा लेख तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. व तुमचे शेअर मार्केट विषयी काही प्रश्न असतील, तर ते कमेंट्स च्या माध्यमातून विचारा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे जरूर देऊ.
0 टिप्पण्या