Share Market in marathi, what is meaning of share market in marathi
नमस्कार मित्रांनो आपण लेखाच्या माध्यमातून अतिशय सोप्या भाषेत शेअर मार्केट म्हणजे काय हे समजून घेणार आहोत.
"ज्या ठिकाणी शेअर्स खरेदी व विक्री केले जातात अशा व्यवस्थेला किंवा ठिकाणाला शेअर मार्केट असे म्हणतात"
शेअर मार्केटमध्ये व्यावसायिक संस्था व कंपन्या आपल्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल गुंतवणूकदारांना आपल्या कंपनीचे शेअर्स विकून उभारतात व गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीवर आकर्षक व जास्त परतावा मिळण्यासाठी व्यवसायिक संस्था व कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक करतात. सामान्यपणे शेअर्स मध्ये गुंतवलेल्या रकमेवर बँकेच्या व्याजापेक्षा तसेच मुदत ठेवी पेक्षा जास्त परतावा मिळतो.
जेव्हा एखादी गुंतवणूकदार एखाद्या विशिष्ट कंपनीचे शेअर्स विकत घेतो तेव्हा तो त्या कंपनीचा सामान्य भागधारक म्हणजेच मालक होतो. परंतु यामध्ये त्याला काही मर्यादित अधिकार मिळतात. मित्रांनो आज-काल शेअर खरेदी व विक्रीचे सर्व व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने केले जातात त्यामुळे तुम्ही जगातल्या कोणत्याही भागातून काही सेकंदात कुठल्याही कंपनीचे शेअर्स खरेदी व विक्री करु शकतात. मित्रांनो आपल्या सामान्य मराठी माणसाच्या मनात शेअर मार्केट विषयी अनेक प्रश्न व गैरसमज आहेत, या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण हे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच मराठी माणसाला शेअर मार्केट मध्ये येण्यास प्रोत्साहन देणार आहोत तर मित्रांनो आपले लेख जास्तीत जास्त मराठी माणसांसोबत शेअर करा.
0 टिप्पण्या