PPF in marathi, पीपीएफ, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, Public Providend Fund, share market in marathi, information in marathi
नमस्कार मित्रांनो,
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ ही भारतातील सर्वात सुरक्षित आणि दीर्घकालीन कर बचत गुंतवणूक योजना आहे. याचे कारण म्हणजे पीपीएफ गुंतवणूक भारत सरकार चालवित आहे. पीपीएफ खाती कोणत्याही राष्ट्रीयीकृत, अधिकृत बँक आणि काही विशिष्ट खासगी बँका आणि टपाल कार्यालये उघडता येतात.
पीपीएफ गुंतवणुकी विषयी महत्वाचे मुद्दे -
1. पीपीएफ खात्याचा व्याजदर केंद्र सरकारकडून साधारणतः दरवर्षी घोषित केला जातो. खात्यात चक्रवाढ पद्धतीने व्याज जमा केले जाते.
2. पीपीएफ गुंतवणुकीवर मिळणारे व्याज हे मुदत ठेवी पेक्षा जास्त असते त्यामुळे बहुसंख्य गुंतवणूकदार गुंतवणुकीला अग्रस्थानी ठेवतात
3. पीपीएफमध्ये गुंतवणूकीची किमान रक्कम 500 रुपये आहे.
4. पीपीएफवर मिळालेल्या रिटर्न किंवा व्याजावर कर आकारला जात नाही आणि आपण दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून आयकर कलम 80 सी अंतर्गत कर देखील वाचवू शकता.
5. पीपीएफ खाते उघडल्यापासून सातव्या वर्षानंतर मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी मिळते.
6. ज्या वर्षी पीपीएफ खाते उघडले आहे, त्या आर्थिक वर्षांनंतरच्या १५ वर्षांनंतर खातेदार आपली संपूर्ण रक्कम काढून घेऊन ते खाते बंद करू शकतो.
7. खातेदाराच्या मृत्यूच्या संभावनेमध्ये त्याच्या नामनिर्देशकाला (Nominee) त्या खात्यामधील जमा रक्कम देण्यात येते.
पीपीएफ खाते कोणाला उघडता येते :-
1. प्रत्येक भारतीय नागरिकाला पीपीएफ खाते उघडता येते. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला हे खाते उघडता येते.
2. एका नागरिकाला एकच पीपीएफ खाते उघडता येते.
3. अल्पवयीन मुलांच्या नावानेही पीपीएफ खाते उघडता येते. मात्र वार्षिक रक्कम भरण्याची १.५ लाख रुपयांची कमाल मर्यादा अल्पवयीन खातेदार व त्याचा पालक यांच्यासाठी संयुक्तरीत्या लागू होते.
4. अनिवासी भारतीयांना पीपीएफ खाते उघडता येत नाही.
0 टिप्पण्या