Mutual fund in marathi, mutual fund marathi, mutual fund information in marathi, mutual fund in hindi, mutual funds information in marathi, mutual fund hindi, sharemarket in marathi
'म्युच्युअल फंड सही है' अशी जाहिरात आपण वारंवार पाहतो. गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंड हा आपल्या परवलीचा शब्द झालेला आहे. म्युच्युअल फंड हा एक लोकप्रिय व आकर्षक परतावा देणारा गुंतवणुकीचा पर्याय आहे. आज आपण म्युच्युअल फंड विषयी माहिती घेणार आहोत
10 मित्र होते, त्यांना भाड्याने घर घ्यायचे होते. त्यांनी मिळून एक माणूस नेमला. त्या माणसाचे नाव आपण Mutual Fund असे गृहीत धरू. Mutual Fund चे काम आहे की तो सर्व 10 मित्रांसाठी घर शोधेल, घरमालकाशी, बोलणी करेल, घर भाडे पण तोच ठरवेल तसेच मित्रांकडून दरमहा भाडे जमा करेल व घरमालकांना ते घरभाडे नेऊन देईल.
ह्या उदाहरणात Mutual Fund ने थोड्या फी मध्ये, सर्व लोकांची सारखी असलेली समस्या सोडवली. त्यामुळे त्या 10 मित्रांना आता घर शोधण्याची चिंता राहिली नाही. ते आपल्या कामावर लक्ष देऊ शकत होते.
असेच काहीसे म्युच्युअल फंड मध्ये असते. म्युच्युअल फंड ही सर्वांची एक समस्या सोडवतो, ती म्हणजे “गुंतवणूक कुठे करावी"
इथे जसे 10 मित्र मिळून एकत्र आले. तसेच म्युच्युअल फंड मधे होते. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंड कडे येतात.
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांकडून पैसा जमा करून विविध ते ठिकाणी गुंतवतात व या बदल्यात ते काही फी घेतात.
म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांना कमी जोखीम घेऊन चांगला परतावा देण्यासाठी लोकप्रिय आहेत.
म्युच्युअल फंड या सदरातील पुढच्या भागात (भाग - 2) आपण म्युच्युअल फंड चे फायदे व तोटे समजून घेऊ तसेच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी याविषयी माहिती घेऊ.
0 टिप्पण्या