डिमॅट खाते काय असते ? Demat Account Information in marathi

Share market in marathi, share market marathi, demat account in marathi, demat account in hindi, demat account information, how to open demat account in marathi

नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे डिमॅट खाते (Demat Account) असणे आवश्यक असते. डिमॅट खाते शिवाय शेअर मार्केटमध्ये आपण कुठलेही व्यवहार करू शकत नाही. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला डिमॅट खाते विषयी संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. या पोस्टच्या माध्यमातून आपण डिमॅट खात्या विषयी प्राथमिक माहिती घेणार आहोत.

What is Demat Account in Marathi -


डिमॅट हे कसे अकाउंट आहे, ज्याद्वारे लोक शेअर्स खरेदी व विक्री करु शकतात. ज्याप्रकारे आपण बँक खात्यामध्ये पैसे ठेवतो ठीक त्याचप्रमाणे डिमॅट खात्यामध्ये आपले शेअर ठेवण्यात येतात.
Demat चे संपूर्ण नाव 'Dematerialize' आहे.
Dematerialize म्हणजे शेअर्स किंवा इतर सेक्युरिटीज ची भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये बदलण्याची प्रक्रिया.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर डिमॅट अकाउंट हे एका गोदामा प्रमाणे आहे, जेव्हा आपण एखादी शेअर खरेदी करतो तेव्हा तो शेअर या गोदामांमध्ये ठेवला जातो आणि जेव्हा हा शेअर विकला जातो तेव्हा तो या गोदामातून काढून दुसऱ्या खरेदीदारास दिला जातो.
एखाद्या खरेदीदाराने खरेदी केले व त्याच्या मालकीचे असलेले सर्व शेअर्स तो आपल्या डिमॅट खात्यामध्ये बघू शकतो.

डिमॅट प्रक्रिये चा इतिहास -


1996 साली भारतामध्ये डिमॅट ची सुरुवात झाली. NSE (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) ने सर्वप्रथम खरेदीदाराने खरेदी केलेले शेअर्स डिमॅट खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केली. त्यापाठोपाठ BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) ने ही प्रक्रिया अवलंबली. 1996 पूर्वी खरेदीदाराने खरेदी केलेल्या शेअर्सचे प्रमाणपत्र (शेअर्स सर्टिफिकेट) त्याला पोस्टाद्वारे पाठवले जायचे. ही सर्व प्रक्रिया खूप अतिशय वेळखाऊ तर होतीच परंतु यामध्ये शेअर्स प्रमाणपत्रे गहाळ होण्याचा धोका असायचा तसेच खूपदा ही प्रमाणपत्रे फाटली जायची. त्यामुळे हे सर्व धोके लक्षात घेऊन खरेदी केलेल्या शेअर्सचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वितरण व्यवस्था सुरू करण्यात आली. आजच्या घडीला शेअर मार्केट चे सर्व व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने केले जातात त्यामुळे शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यासाठी डिमॅट अकाउंट अनिवार्य केले आहे.‌
मित्रांनो या पोस्ट विषयी व‌ एकूणच शेअर बाजाराविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स च्या माध्यमातून ते विचारू शकता. ही महत्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.

Thank You...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या